चंदननगर ! बापाने केले 15 वर्षाच्या मुलीला गर्भवती; 42 वर्षाच्या नराधमाला अटक

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे:एका १५ वर्षाच्या मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ती गर्भवती (Pregnant) असल्याचे लक्षात आले.
तिच्याकडे चौकशी केल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला. बापाने तिच्यावर सातत्याने अत्याचार केल्याने त्यातून ती गर्भवती राहिल्याचे आढळून आले. (Pune Crime News)

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम ए मुळुक (Sub-Inspector of Police M A Muluk) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुलीच्या ४२ वर्षाच्या बापाला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार लातूर (Latur News) जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जोगन चिंचोली व खराडी येथील थिटे वस्तीत जून २०२२ पासून ते ४ एप्रिल २०२३ पर्यंत सुरु होता. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मुळचा औसा तालुक्यातील जोगन चिंचोली येथील राहणारा आहे.
तो मोलमजुरी करतो. एक वर्षापूर्वी त्याच्या पत्नीचे निधन झाले.
त्यानंतर तो व त्याची १५ वर्षाची मुलगी दोघेच घरात रहात होते. गेल्या वर्षी जून २०२२ मध्ये त्याने आपल्या मुलीवर अत्याचार केला.
त्यानंतर तो सातत्याने तिच्यावर अत्याचार करीत राहिला. काही महिन्यांपूर्वी ते दोघे पुण्यात आले.
येथे आल्यावरही तो तिच्यावर अत्याचार करत होता. ४ एप्रिल रोजी तिच्या पोटात दुखु लागले.
त्यामुळे तिला उपचारकामी ससून रुग्णालयात आणण्यात आले.
डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ती गर्भवती असून ६ ते ७ महिने झाल्याचे लक्षात आले.
डॉक्टरांनी ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी मुलीकडे चौकशी केल्यावर बापाने हे नीच कृत्य केल्याचे समोर आले.
पोलिसांनी बापाला अटक केली आहे.