लग्नाचं अमिष दाखवून 21 वर्षीय तरुणाचा 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई:लग्नाचे आमिष दाखवून 20 वर्षीय महिलेवर बलात्कार (Rape) करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाविरुद्ध रबाळे एमआयडीसीत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार आहे.
ही मुलगी आरोपीच्या मूळ गावची असून ते एकमेकांना ओळखत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने पीडित मुलीला तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगून तिला मुंबईला जाण्यास सांगितले होते. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी गेल्या वर्षी मुंबईत आला होता. नोकरी मिळाल्यानंतर त्याने पीडितेला मुंबईला बोलावले. शेराली मुस्तफा अली उर्फ दानिश शेख असे आरोपीचे नाव असून तो गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोकरीसाठी मुंबईत आला होता. नोकरी मिळाल्यावर त्याने पीडितेला लग्नाच्या बहाण्याने मुंबईला बोलावले. ( Thane Shocker: हेअरकट आवडला नाही म्हणून 13 वर्षांच्या मुलाची आत्महत्या; 16 व्या मजल्यावरून मारली उडी)

आरोपीने तिला एका कंपनीत नोकरी मिळवून दिली आणि एक अपार्टमेंटही भाड्याने घेऊन एकत्र राहू लागला. दोघे एकत्र राहत असताना शेखने आपल्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोपही तरुणीने तिच्या तक्रारीत केला आहे.

गेल्या आठवड्यात एका किरकोळ कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. यानंतर शेखने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि तो उत्तर प्रदेशातील त्याच्या गावी पळून गेला.