ताज्या बातम्यामहाराष्ट्र

किराडपुरा दंगलीतील आणखी पंधरा अटकेत


छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आणखी १५ आरोपींच्‍या विशेष तपास पथकाने मुसक्या आवळल्या. आरोपींना ६ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी एएस. वानखेडे यांनी सोमवारी (ता. तीन) दिले.



शेख अबरार शेख महेबूब (वय ३०, रा. रहिमनगर), शेख शफिक शेख शरीफ (वय ३०, रा. बायजीपुरा), तालेब उस्‍मान शहा (वय २४, रा. कच्‍ची घाटी), शेख रिझवान शेख सत्तार (वय २२, रा. किराडपुरा), शहेबाज अजिज पठाण (वय २२, रा. बाबर कॉलनी), शेख पाशा शेख महेमुद (वय ३१, रा. गणेश कॉलनी, रशिद पुरा), आसेफ पठाण असदउल्‍ला पठाण (वय २५, रा. किराडपुरा), खमरोद्दीन मोमीन शकील मोमीन (वय २१, रहिमनगर, अल्तमश कॉलनी), सरफराज खान बाबु खान (वय २३, रा. हर्सुल),

जुनेद शेख जुबेर शेख (वय २४, रा. कटकटगेट), शेख जमीर शेख शब्बीर (वय ४६, रा. कौसर पार्क, नारेगाव), शेख अकबर शेख पाशा (वय २९, रा. कैसर कॉलनी), मोहसिन खान युसूफ खान (वय २९, रा. शरीफ कॉलनी), मोहम्मद सोफियान अब्दुल सलाम (वय ३१, रा. शहा बाजार, चाऊस कॉलनी) आणि सय्यद जुबेर सय्यद खालेद (वय ४९, रा. बसैय्ये नगर, संजयनगर) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्‍हा हा गंभीर स्‍वरुपाचा आहे.

आरोपींचे आणखी कोण सा‍थीदार आहेत याबाबत आरोपींकडे चौकशी करायची आहे. गुन्‍ह्यात वापरलेले लाठ्या-काठ्या, सळ्या हस्‍तगत करायचे आहेत.

त्‍याचप्रमाणे गुन्‍हा करण्‍यामागे आरोपींचा नेमका हेतू काय होता याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी यांनी न्‍यायालयाकडे केली होती. त्‍यानंतर न्‍यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button