क्राईमताज्या बातम्या

पाच वर्षांपूर्वी बलात्कार करून सटकला; ओळख बदलून लपून राहणारा आरोपी म्हैसूरमध्ये सापडला


मैसूर:पाच वर्षांपूर्वी एका बस क्लिनरच्या वासनेची बळी पडलेल्या महिलेला अखेर गुन्हे शाखेच्या घाटकोपर येथील युनीट-7 ने न्याय मिळवून दिला. महिलेवर बलात्कार केल्यानंतर आरोपी मुंबई बाहेर सटकला होता.
विक्रोळी पोलिसांनी कसून शोध घेऊनही तो सापडत नव्हता. अखेर युनीट-7 च्या पथकाने शिताफिने शोध घेऊन अनुपम दास (25) या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.



राणी (नाव बदलेले) हि 35 वर्षीय महिला 25 नोव्हेंबर 2018 च्या रात्री पतीसोबत भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात घराबाहेर पडली होती. ती कांजूर मार्ग येथील गांधीनगर परिसरात एका बस स्टॉप जवळ उभी असताना आरोपी ज्या खासगी बसवर क्लिनरचे काम करत होता ती बस घेऊन एकटी महिला बघून राणी जवळ येऊन थांबला. रात्र खुप झाली घरी सोडतो असे सांगत त्याने राणीला बसमध्ये बसवले आणि तिला गुंगीकारक पेय पाजून तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला. हे कृत्य केल्यानंतर अनुपमने मुंबई सोडली. दरम्यान याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. आसाम येथील त्याच्या मूळ गावी जाऊनही शोध घेतला. मात्र अनुपमचा थांगपत्ता लागला नाही. पाच वर्षे तो पोलिसांना सापडतच नव्हता.

म्हैसूरमध्ये मुसक्या आवळल्या

युनीट-7 चे वरिष्ठ निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बाळगी, जातेधव, उबाळे, उपनिरीक्षक रामदास कदम, स्वप्निल काळे तसेच दिपक पवार व विनोद शिरापुरी या पथकाने अनुपमचा शोध घेण्यास सुरूवात केली. तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास केला असता अनुपम म्हैसूर येथील एका प्लास्टिकच्या कंपनीत काम करीत असल्याची माहिती रामदास कदम यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने म्हैसूर गाठून अनुपमच्या मुसक्या आवळल्या.

आहे आसामचा सांगितले बिहारचा

महिलेवर बलात्कार केल्यानंतर अनुपम बंगळूरूला पळून गेला. तेथे नाव बदलून त्याने वेगवेगळया ठिकणी काम केले. तेथून तो मग म्हैसूरला गेला. तेथेही विविध ठिकाणी त्याने काम केले.सध्या तो तेथील एका प्लास्टिकच्या कंपनीत खोटे नाव सांगून काम करीत होता. मूळचा आसामचा असलेल्या अनुपमने कंपनी मालकाला बिहारचा असल्याचे तसेच आधार कार्ड वगैरे नसल्याचे सांगून काम मिळवले होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button