सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडिओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा.
कारण इथे अनेकदा चूक तुमची नसते, पण तरीही तुम्हाला शिक्षा भोगावी लागते. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावरून चालत आहे पण त्याच दरम्यान मागून एक गाडी त्याला जोरात धडक देणार असते. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचतो.ऐसा Alert दोस्त सबके पास होना चाहिए !!!!!!!!! pic.twitter.com/W7uSalFm7k
— Hasna Zaroori Hai 🇮🇳 (@HasnaZarooriHai) March 28, 2023
रस्त्यावरून चालताना प्रत्येकाने अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण जर तुमचं लक्ष इकडे तिकडे भटकलं तर तुमचा अपघात कधीही आणि कसाही होऊ शकतो. जरा ही क्लिप बघा, ज्यात दोन लोक रस्त्याच्या कडेने जात असताना अचानक ट्रॉली पडते, सुदैवाने त्या मुलाच्या मित्राने त्याला लगेच खेचलं.
अन्यथा यात त्याचा जागीच मृत्यू झाला असता, यात शंका नाही.
या चकित करणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की रस्त्यावर अनेक वाहने धावत आहेत आणि दोन मित्र बाजूने बोलत चालले आहेत. दरम्यान, अचानक एक ट्रॅक्टर येतो आणि त्याची ट्रॉली रस्त्यावरच पलटते. हे सर्व इतक्या वेगाने घडलं की कोणालाही काही समजण्याची संधी मिळत नाही.
परंतु मुलाचा मित्र इतका सतर्क होता, की त्याने लगेचच आपल्या मित्राला मृत्यूच्या तोंडातून बाहेर काढलं. इथे क्षणभरही विलंब झाला असता तर मुलाचा मृत्यू निश्चित होता. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.