वर्धा : जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गांवर ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिली.
यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री साडे बारा वाजता दरम्यान घडला.
डॉक्टर ज्योती क्षीरसागर,डॉक्टर फाल्गुनी सुरवाडे, भरत क्षीरसागर अशी मृतकाची नाव आहे. घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांनी कर्मचाऱ्यांसाह घटनास्थळी पोहचत वाहतूक सुरळीत केली.
नागपूरला (Nagpur) कामानिमित्त रात्री समृद्धी महामार्गाने जातं असताना ज्योती क्षीरसागर हिचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली कार ही समोरील ट्रकला मागून धडकली. यात तिघांचा जागीच मृत्यू झालाय.
जाम महामार्ग पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थ गाठत वाहतूक सुरळीत केली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत सेलू पोलिसांना माहिती दिली. तीनही मृतदेह सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, याआधी देखील समृद्धी महामार्गावर अनेक भीषण अपघात झाले आहे. त्यामुळे या अपघातांची मालिका कधी थांबणार असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.