माजी सरपंच पत्नीची पतीच्या वाढदिवसादिवशीच आत्महत्या..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


कोल्हापूर : जिल्ह्यातील करवीर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये माजी सरपंच पत्नीने आपल्या पतीच्या वाढदिवसादिवशीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सुप्रिया बाजीराव वाडकर Supriya Bajirao Wadkar (वय 33. रा. हणबरवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सुप्रिया यांचे वडिल दिलीप शामराव पाटील Dilip Shamrao Patil (वय 59, रा. सैनिक टाकळी, ता. शिरोळ) यांनी इस्पूर्ली पोलीस ठाण्यात (Ispurli Police Station) तक्रार दाखल केली आहे. मृत सुप्रिया यांचे पती बाजीराव वाडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत सुप्रिया यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

या प्रकरणी सुप्रिया यांचे वडिल दिलीप शामराव पाटील यांनी इस्पूर्ली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हंटले कि पती बाजीरावने 2012 पासून सुप्रिया यांना माहेरकडून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. यासाठी सातत्याने चारित्र्याचा संशय घेऊन मानसिक आणि शारिरीक त्रास दिला जात होता. त्यामुळे सातत्याने होणाऱ्या जाचाला कंटाळून हणबरवाडीमधील राहत्या घरी गळ्याला गळफास घेत आत्महत्या केली.

बाजीरावचा शनिवारी वाढदिवस होता. मुले शाळेल्या गेल्यानंतर सुप्रिया यांनी आपले पती बाजीराव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यानंतर बाजीराव हे काही कामानिमित्त बाहेरगावी निघून गेले.
यानंतर घरी कोणी नसल्याची संधी साधून सुप्रिया यांनी आपल्या राहत्या घरी गळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांना तातडीने रुंग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.