मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत तरुणाचा भोसकून खून

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


जालना : श्रीराम नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एका तरुणाचा भोसकून खून करण्यात आला
ही घटना जालना शहरातील बडी सडकवरील राम मंदिर परिसरात घडली. विष्णू रामकिसन सुपारकर (30, रा.गवळी मोहल्ला) असे मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी दिली. या घटनेनंतर मोठा जमाव एकत्र आला होता.

शहरात गुरुवारी सायंकाळी रामनवमीनिमित्त जुना जालन्यातील गांधीचमन चौकातून बडीसडकवरील श्रीराम मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बडीसडक पसिरात असताना गर्दीत कुणीतरी विष्णू सुपारकर याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. मात्र, गर्दीत हा प्रकार लवकर कुणाच्या लक्षात आला नाही. दरम्यान, पोलिसांनी गंभीर जखमी विष्णूला तातडीने खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. सदर बाजार पोलीसांनी या प्रकरणी एका संशयीत तरूणास ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.