दिवसभरात सुमारे 500 नव्या रुग्णांची भर,दिवसभरात तीन रुग्णांचा ..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचं चित्र आहे. दिवसभरात ४८३ नव्या रुग्णांची भर पडली असून ३१७ रुग्ण बरेही झाले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. सरकारनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात ४८३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून ३१७ रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानं ते बरे झाले आहेत. तर दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर हा ९८.१५ टक्क्यांवर आहे. तर मृत्यूचा दर १.८२ टक्के आहे.