पांगारे विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पांगारे विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

पुणे : ( आशोक कुंभार ) पांगारे – न्यू.इंग्लिश स्कुल,पांगारे विद्यालय ता. पुरंदर जि. पुणे येथे आज शनिवार दि.२५.०३.२०२२ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन व जागतिक महिला दिनानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धामध्ये यश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी स्थानिक स्कुल कमिटी सदस्य मा.काकडे त्रिंबकराव तर अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.तावरे नंदकुमार होते. विद्यालयात वर्षभर विविध उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यात येतो. विद्यालयात वक्तृत्व, निबंध,रांगोळी,क्रीडास्पर्धा,चित्रकला,विज्ञान रांगोळी आशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.या स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मा.काकडे त्रिंबकराव यांनी आपल्या मनोगतात यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे मनभरून कौतुक केले. विद्यालयातील शिक्षक बंधू-भगिनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत हे आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन सौ.निकम एम.व्ही व सौ.परळे एम.डी यांनी केले. आभार श्री.लडकत पी.सी यांनी मानले.कार्यक्रमस्थळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ.कांबळे एस.डी व श्री.भोसले जी. एन उपस्थित होते.