अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांचे कडून कृषी पंपाचे वीज कनेक्शन बाबत गंभीर दखल

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


महाराष्ट्र : ( आशोक कुंभार )

अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांचे कडून कृषी पंपाचे वीज कनेक्शन बाबत गंभीर दखल, अधीक्षक अभियंत्याला सुनावले तर, तर एफ आर पी न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी. विठ्ठल पवार राजे.

कापसाला प्रतिक्विंटल अकरा हजार तर कांद्याला अठराशे रुपयाची मागणी.
गाईचे दुधाला चाळीस तर म्हशीच्या दुधाला पन्नास रुपये बेस रेट जाहीर करण्याची मागणी.
शेतमाला म्हणजे सर्व भाजीपाला हा दहा रुपये पेक्षा कमी किमतीने खरेदी करू नये असे स्पष्ट लेखी आदेश सरकारने द्यावेत.

अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे कडून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन डिस्कनेक्ट केले जाते बाबत गंभीर दखल घेऊन जिल्ह्याचे महावितरण मुख्य अभियंता यांना भ्रमणध्वनीवरून समज दिली, विठ्ठल पवार राजे यांनी याबाबत अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे आज दिनांक 23 मार्च रोजी समक्ष भेट घेऊन लेखी तक्रार केली त्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांचा एक मेपासून होणारा संप बाबतचे निवेदन नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे कडे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले.

2. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफ आर पी, 15%व्याज व रिकवरी चोरी बाबत नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यामार्फत राज्याचे माननिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे लेखी तक्रारीचे निवेदन पाठवले आहे.

दूध भेसळीचा व दूध दराच्या मुद्द्यावर देखील या ठिकाणी संघटनेने बोट ठेवलेले असून कापसाला 11000 हजार रुपये, तर कांद्याला 1800 रुपये प्रति क्विंटल प्रतिक्विंटल बेस रेट विक्री किंमत मिळावी तर गाईचे दुधाला चाळीस रुपये तर म्हशीचे दुधाला पन्नास रुपये बेस रेट विक्री किंमत दराची मागणी करण्यात आलेली आहे.
तसेच नगर व नगर जिल्हा व पुणे जिल्ह्यातील दूध भेसळीची ठिकाण समुळ नष्ट करण्यासाठी दूध भेसळ करणार्या लोकांना पकडलेले आहे त्या दूध भेसळ गुन्हेगारांवर देशद्रोहाचा कठोर गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी जिल्हाधिकारी यांच्या भेटीनंतर नाशिक – नगर विभागाचे रिजनल जॉईंट डायरेक्टर शुगर मिलिंद भालेराव यांची कार्यालयात समक्ष भेट घेऊन भ्रमणध्वनीवरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप एफआरपी मिळालेली नाही. तसेच एफआरपी व साडेतीन टक्के ते आठ टक्के पर्यंत रिकवरी चोरी च्या संदर्भामध्ये गंभीर स्वरूपाची चर्चा करून अशोक सहकारी साखर कारखाना श्रीरामपूर मध्ये झालेल्या शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्या बाबत गेल्या साडेतीन वर्षापासून चौकशी होत नसून संबंधित चौकशी अधिकाऱ्यांवरती शोकेश नोटीस काढून कडक शिस्तभंगाची कारवाईचे आदेश द्या, याबाबत विशेष लेखा परीक्षक यांना मिलिंद भालेराव यांनी शोकस नोटी काढून नोटीस काढून 31मार्च23 पर्यंत अंतिम चौकशी अहवाल देण्याचे आदेशित केले आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली, यावेळी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार, संघटनेचे युवक अध्यक्ष पुणे अनिल भांडवलकर, राज्याचे कार्यकारणी समितीचे अध्यक्ष अंबादास कोरडे पाटील व पदाधिकारी उपस्थित होते…