आमदार अण्णासाहेब पाटील त्यांच्या स्मृतीस अभिवादन..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी दि:-23 मार्च 1982 रोजी मुंबईत काढलेल्या विशाल मोर्च्यात ”मराठा” समाजाला न्याय मिळाला नाहीतर उद्याचा सुर्य उगवलेला पाहणार नाही..असा शब्द देऊन आपला शब्द खरा करण्यासाठी माथाडी व मराठा नेते अखिल भारतीय मराठा महासंघ अध्यक्ष आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मृत्यूला मिठी मारली..अशा या लोकनेत्याच्या शहिद दिनी
आज दिनांक 23 मार्च 2023 रोजी अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अजय जी पाटील, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख अनिलजी ताडगे, श्री शिवाजी व्यायाम मंडळ अध्यक्ष राहुल दुर्गे, पुणे शहर कार्याध्यक्ष मंगेश साखरे, पुणे शहर संपर्कप्रमुख राजेश केदारी, सरचिटणीस मयूर गुजर, कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अभिषेक जगताप, अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश खोपडे,पुणे शहर उपाध्यक्ष अभिजीत ताठे, मिलिंद बोराडे, मारणे, उपस्थित होते