ढगाळ वातावरणाचा कांदा पिकावर परिणाम, करपा रोगाचा प्रादुर्भाव..

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

ढगाळ वातावरणाचा कांदा पिकावर परिणाम, करपा रोगाचा प्रादुर्भाव..

जुन्नर  :  ( आशोक कुंभार ) जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात मागील दोन दिवसांपासून वातावरणातील ढगाळ हवामानाचा कांदा पिकावर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होताना दिसत आहे.
तालुक्यातील शेतकर्‍यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी हजारो रूपयांची औषध फवारणी करावी लागत आहे, त्यातच कांदा पिकावर सध्या या वातावरणामुळे करपा रोगाचा फार मोठा प्रादुर्भाव होत असल्याने कांद्याच्या पिकाचे शेंडे सुकून गेले आहेत.
खर तर जुन्नरच्या पश्चिम भागातील बोतार्डे, सुराळे, राळेगण, बेलसर, खानगाव, शिंदे, आपटाळे व इतरही गावांतील शेतकरी या वातावरणामुळे कांदा पिकांवर मोठ्या प्रमाणात फवारण्या करत आहेत.
अगोदरच कांदा पिकामुळे शेतकर्‍यांच्या तोंडाला बाजारभाव नसल्याने पाने पुसली आहेत, तरीदेखील शेतकरी मोठे भांडवल गुंतवून फायदा होईल या आशेने हे पिक घेत असतो मात्र निसर्गाच्या लहरी वातावरणाचा परिणाम हा शेतकर्‍यांना भोगावा लागत आहे.
अचानक ढगाळ वातावरण होऊन दमट हवामान निर्माण झाल्याने अवकाळी पाऊसदेखील पडत असल्याने शेतकरी चिंतीत झालेला आहे.
चौकट:- ढगाळ वातावरण झाल्याने कांदा पिकावर करपा रोग गेल्याने पिके वाळून गेली आहेत, मात्र औषधांची फवारणी केल्याने आहे त्या कांदा पिकाचे संरक्षण होईल अशी आशा आहे शेतकर्‍यांना.

मुकेश मरभळ- शेतकरी