पाचजणांच्या त्रासाला तरुण कंटाळला; गळफास लावून संपवले जीवन

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

धाराशिव : पाच जणांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना भूम तालुक्यातील साळेसांगवी येथे १५ मार्च रोजी घडली. या प्रकरणी भूम ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, भूम तालुक्यातील राळेसांगवी येथील चैतन्य धोत्रे (२४) यास गावातील सुर्यकांत टाळके, लक्ष्मण टाळके, संतोष टाळके, नमोद टाळके, सुमीत टाळके हे त्रास देत होते. यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून चैतन्य याने भरत टाळके यांच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. अशी फिर्याद मयताचे वडील – गोवर्धन धोत्रे यांनी १५ मार्च रोजी भूम पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.