ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भव्य रस्ता रोको आंदोलन


औरंगाबाद अहमदनगर हायवे प्रीतीसंगम नेवासा प्रीती संगम चौक येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रचंड शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन. 

नेवासा : ( आशोक कुंभार ) मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानुसार राज्य अन्न आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील कृषी उत्पादक शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन खंडित करू नये असे सक्त आदेश आयोगाने दिलेले असताना, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या समवेत संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांचे सह्याद्री अतिथीग्रहा येथे झालेली बैठक त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सत्तादेशानंतर, 10 डिसेंबर रोजी महावितरण ने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन खंडित करू नये व कोणती सक्तीची वीज बिल वसूल करु नये याबाबत काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी राज्यातील सर्वच ठिकाणच्या महावितरणचे अधिकारी, कायदा पायदळी तुडवत आहेत, कोर्ट, राज्यांना एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे आदेश पाळत नसल्यामुळे, कायद्याची पायमल्ली करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामद्ये कंटेंमट ऑफ कोर्ट, कर्तव्यात कसूर व दप्तर दिरंगाई, शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक, छळ करत असल्याच्या कारणास्तव महावितरणचे संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार व छळ करणारे त्यांचे विरोधामध्ये एफ आय आर दाखल करावा व शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन यापुढे कधीही खंडित न करता सलग पुरवठा करावा या मागणीसाठी…
*प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विद्यमान आमदार व माजी राज्यमंत्री आदरणीय ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू साहेब व शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांचे नेतृत्वाखाली, घटनेचे प्रदेश कार्यकारणी समितीचे अध्यक्ष आंबादास कोरडे पाटील यांच्या व प्रहार संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजीत पोटे यांच्या नेतृत्वाखाली आज औरंगाबाद नगर हायवे नेवासा संगमनेर संगम येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड वेळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.*
त्यावेळी पुणे नगरहून औरंगाबाद कडे जाणाऱ्या तर औरंगाबादहून नगर, पुण्याकडे जाणाऱ्या हायवेवर सुमारे दहा ते पंधरा किलोमीटरअंतरावर वहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. छायाचित्रांमध्ये उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना संघटनेचे प्रदेश कार्यकारणी समितीचे अध्यक्ष अंबादास कोरडे पाटील व प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष युवा नेते अभिजीत पोटे पाटील उपस्थित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व उपस्थित शेतकरी जनसमुदाय.
यापुढे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या देठही पाण्यावाचून सुकणार नाही किंवा पिकाच्या देठाला जरी आर्थिक नुकसान पोहोचले तर महावितरणच्या अधिकाऱ्यांची,. किंव्हा इतर कोणचीही गय जाणार नाही! किंवा संबंधिताची देखील गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन बेकायदेशीरपणे खंडित केले किंवा शेतकऱ्यांचा आर्थिक, मानसीक, छळ, शेतकऱ्यांच्या पिकाचे आर्थिक नुकसान केल्यास, राज्यातील सर्व संबंधित महावितरण चे अधिकाऱ्यां विरोधात कंटेंट ऑफ कोर्ट, केस, नाईलाजास्तव दाखल करण्याची कारवाई शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी भ्रमणध्वनीवरून बोलताना दिला ते मुंबई मंत्रालय येथून नेवासा नगर संगम फाटा येथील पत्रकारांशी बोलत होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button