कानळद जि.प.प्रा.शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


कानळद जि.प.प्रा.शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

निफाड प्रतिनिधी कृष्णा जाधव : जिल्हा परिषद प्रा. शाळा कानळद येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध लोकनृत्य, सामाजिक व देशभक्तीपर नृत्यांचे सादरीकरण करत उपस्थित नागरिकांची मने जिंकली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेर पं.समिती विरोधी पक्षनेते सरुनाथ उंबरकर, सरपंच शांताराम जाधव, पं.समितीचे माजी सभापती शिवा सुरासे, वि.का.स.सेवा संस्था चेअरमन शिवाजी सुपनर, शिरवाडे सरपंच श्रीकांत आवारे, किरण आवारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

उत्कृष्ट नृत्यासाठी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना भरभरून बक्षीस तर डॉ.श्रीकांत आवारे यांनी शाळेसाठी साऊंड सिस्टिम बक्षीस म्हणून दिले. याप्रसंगी उपसरपंच प्रवीण पगारे, किरण जाधव, कृष्णा जाधव, विष्णू पारखे, डॉ.सचिन शिंदे, मच्छिंद्र जाधव, जालिंदर जाधव, विक्रम जाधव, कैलास जाधव, सर्जेराव पारखे, विष्णू पगारे, प्रकाश जाधव, राहुल जाधव, ताराबाई पारखे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय अहिरे, किरण शिंदे व व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपत जाधव व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.