६ हजाराची गादी विकण्याच्या नादात ३ लाख ५५ हजार ८९८ रुपयांचा फटका
नवी मुंबई : ( आशोक कुंभार )ओएलएक्स या अँप जुन्या वस्तू विकणे किवा खरेदी करण्यासाठी वापरला जातो. मात्र याच अँप द्वारे सायबर गुन्हेगार सावज शोधून त्यांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. अशाच प्रकारे नवी मुंबईतील एका महिलेने गादी विकण्याची जाहिरात टाकल त्याला प्रतिसाद देण्यार्या व्यक्तीने हिच संधी साधून सदर महिलेस गोड बोलून त्यांच्याच खात्यातून तब्बल ३ लाख ५५ हजार ८९८ रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून सायबर सेल याचा तपास करीत आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात राहणाऱ्या ललिता रोम्पिचर्ला यांनी ओएलएक्सवरुन गादी विकण्याची जाहिरात दिली होती. गादीची अपेक्षित किमत ६ हजार सांगण्यात आली होती. त्याला दिपक शर्मा नावाने सायबर चोरट्याने ललिता यांच्या मोबाईल फोनवर संपर्क साधून गादी विकत घेण्याची तयारी दर्शविली. सदर सायबर चोरटा पनवेल येथील जे.जे. वुड या फर्निचर स्टोअरमध्ये काम करत असल्याचे ललिता यांना सांगितले सदर व्यक्ती खरेच या ठिकाणी काम करीत आहे कि नाही याची खात्रीही ललिता यांनी केली होती. दिपक याने त्याच्या अन्य मोबाईल क्रमांकाच्या व्हात्स ऐप वरून क्यूआर कोड पाठवला व त्यावर एखादी रक्कम टाकण्यास सांगितले व त्यानंतर स्वतः ६ हजार पाठवतो असे सांगितले. सुरवातीला ललिता यांनी एक रुपया पाठवला. मात्र सदर क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर या महिलेच्या खात्यातून ६ हजार रुपये गेले.
त्यानंतर त्याने पुन्हा दुसरा क्युआर कोड पाठवुन त्याच्या मार्फत या महिलेला ६ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. यावर ललिता यांनी सायबर चोरट्याला १८ हजार रुपये पाठविण्यास सांगितले असता, त्याने पुन्हा दोन क्युआर कोड पाठवून त्यांच्या खात्यातून आणखी काही रक्कम काढून घेतली. अशा पद्धतीने हळू हळू करीत त्यांच्याच खात्यातून तब्बल ३ लाख ५५ हजार ८९८ रुपये काढून घेण्यात आले. हा प्रकार थांबतच नसल्याने आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ललिता यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.