ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

एकाच वेळी तब्बल 4 बाळांना जन्म


लखनऊ: ( आशोक कुंभार ) देव जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो, नाहीतर काहीच नाही. असंच एका महिलेसोबत घडलं आहे. जिने एक दोन नव्हे तर एकाच वेळी तब्बल 4 बाळांना जन्म दिला4-4 बाळांची आई होण्याचा आनंद या महिलेच्या चेहऱ्यावर येतो न येतो तोच काही क्षणात तिचा हा आनंद हिरावला गेला. एकाच वेळी चार बाळांना जन्म देऊनही आई होण्याचं सुख तिला काही मिळालं नाही. नियतीने तिच्यासोबत असा अजब खेळ केला की तिची कुस रिकामीच राहिली. उत्तर प्रदेशमधील ही हृदयद्रावक घटना आहे.

यूपीतील शाहजहांपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये एका महिलेला डिलीव्हरीसाठी दाखल करण्यात आलं. शिवानी असं या महिलेचं नाव आहे. तिची डिलीव्हरी झाली. एकाच वेळी तिने एकूण 4 बाळांना जन्म दिला.

यात तीन मुली आणि एक मुलगा होता. पण जन्मानंतर एकही बाळ या जगात राहिलं नाही. ना या महिलेला आई होण्याचं सुख लाभलं. चार बाळांपैकी तीन मुलींचा प्रसूतीदरम्यानच मृत्यू झाला.

कसाबसा मुलगा प्रसूतीवेळी जिवंत होता. पण नंतर उपचारानंतर त्यानेही जीव सोडला. माहितीनुसार महिलेची प्रकृती सध्या ठिक आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

रुग्णालयात पहिल्यांदाच एका महिलेने एकाच वेळी 4 बाळांना जन्म दिला होता. पण काही क्षणातच तिथंच या चारही बाळांचा मृत्यू झाल्याने सर्वांना धक्का बसला. यूपीमध्ये 2021 सालीही एका महिलेने एकाच वेळी 4 मुलांना जन्म दिला होता.

यात मुलं आणि एका मुलीचा समावेश होता. आईसह चारही बाळांची प्रकृती उत्तम होती. गाझियाबादच्या नेहरूनगरमधील यशोदा हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन करण्यात आलं होतं. या हॉस्पिटलमध्ये झालेलं अशा प्रकारचं हे पहिलंच ऑपरेशन असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पहिल्यापासून योग्य नियोजन, औषधोपचार आणि आहारामुळे ही अवघड शस्त्रक्रिया पार पडल्याचंही डॉक्टर म्हणाले होतं. –
जुळं, तिळं आणि चारपेक्षाही अधिक बाळं जन्माला आल्याची काही प्रकरणं आहे. कुणी पाच, कुणी 6 तर कुणी एकाच वेळी 9 बाळांना जन्म दिल्याचीही प्रकरणं याआधी चर्चेत आली होती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button