Video:मुंबई पोलिसांची गाडी सुसाट,ना सीटबेल्ट ना ..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


वाहतुकीचे नियम फक्त सर्व सामान्य जनतेलाच आहेत का? पोलिसांसाठी नाहीत का?

मुंबई : मुंबई पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडले जात असल्याची माहिती समोर आली असून फोनवर बोलत असताना गाडी चालवणाऱ्या एका चालक असलेल्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा मुंबई येथील असून गाडीवर मुंबई पोलीस असं लिहिलेलं असून मुंबई पोलिसांचा लोगो या गाडीवर आहे. तर गाडीतील चालक कर्मचारी फोनवर बोलताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

 

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील पोलिसांच्या गाडीचा नंबर MH 01 AN 1785 असा असून चालकाने सीटबेल्टसुद्धा लावला नसल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.