मुले कमी जन्माला घातल्याने परीक्षार्थी घटले, बोर्डाच्या अध्यक्षांचा अजब दावा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे : ( आशोक कुंभार ) राज्यात बारावीच्या परीक्षा सुरू असताना इयत्ता दहावी परीक्षेसदेखील 2 मार्चपासून सुरुवात होत आहे परंतु यंदा दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. विद्यार्थी संख्येत घट झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अध्यक्षांनी अजब दावा केला आहे. पालक कमी पाल्य जन्माला घालत असल्याने विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे, असे त्यांनी म्हटलंय. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 61 हजार विद्यार्थी कमी झाल्याची माहिती बोर्डाने दिलीय.