ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

सोने तारणच्या नावाखाली गंडविणार्यास अखेर अटक


नाशिक : एका ठिकाणी सोने तारण ठेवल्याचे सांगून त्यावर दुसर्या गोल्ड फायनान्सकडून पैसे घेत गंडा घालणार्या संशयित तरुणाला अखेर शहर खंडणीविरोधी पथकाने जेरबंद (Arrested) केले.
संशयित तरुणाने आठवड्यात दोन घटनांमध्ये घेतलेले चार लाखांची रोकड अवघ्या काही दिवसात मौजमजेवर उडविल्याचे तपासातून समोर आले आहे. प्रथमेश उर्फ गुच्छा श्याम पाटील (२५, रा. गाझी गढी, मोदकेश्वर वसाहत, गाडगे महाराज धर्मशाळा, जुने नाशिक) असे संशयित तरुणाचे नाव आहे.त्याच्याविरोधात पंचवटी व गंगापूर पोलिसात गंडा घातल्याचे गुन्हे दाखल आहेत. सदरील गुन्हयाचा तपास पोलीस ठाण्यासह शहर गुन्हेशाखेच्या खंडणी विरोधी पथकही करीत असताना, पोलीस अंमलदार भगवान जाधव यांना संशयित पाटील हा गोल्फ क्लब मैदान परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार, खंडणी विरोधी पथकाने परिसरात सापळा रचला आणि संशयित प्रथमेश पाटील यास अटक केली. पोलीस चौकशीमध्ये त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यास अटक करून गंगापूर पोलिसांच्या ताब्यात अधिक तपासासाठी देण्यात आले आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक बैसाने हे करी आहेत.

सदरची कामगिरी आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली खंडवी विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, सगळे, रोकडे, राजेंद्र भदाणे, चकोर, स्वप्निल जुंद्रे, भगवान जाधव, भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, सविता कदम यांनी बजावली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button