मुलीच्या प्रेमाची माहिती मिळाली अन् मुलाचा खेळ खल्लास, प्रेमप्रकरणाचा भयानक शेवट

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बोरसर:  जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. वैजापूर तालुक्यातल्या बोरसर गावात एका दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
अखेर या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. या मुलाची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृतदेहाचं गूढ उलगडलं घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील बोरसर गावात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.

या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

मुलीच्या नातेवाईकांकडून हत्या सचिन काळे असं या मृत मुलाचं नाव आहे. तो दहावीमध्ये शिकत होता. या तरुणाचे एका मुलीवर प्रेम होते. या प्रेमप्रकरणाची माहिती मुलींच्या घरच्यांना कळाली.त्यानंतर मुलीचे आजोबा, वडील आणि काकांनी या मुलाला लाठ्या-काठ्याने जबर मारहाण केली.

मारहाणीनंतर त्यांनी या तरुणाला फरफटत आपल्या शेतात नेऊन टाकले. या तरुणाला वेळीच उपचार न मिळाल्यानं त्याचा मृत्यू झाला. या मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.