दुर्मिळ असलेला ‘निवडुंग’ रानमेवा आरोग्यासाठी पोषक
दुर्मिळ असलेला ‘निवडुंग’ रानमेवा आरोग्यासाठी पोषक
————————————
दुर्मिळ वनस्पती चाखण्याचा पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना योग
———————————–
आष्टी : अगदी प्राचीन,मध्ययुगीन ग्रंथातील ज्यांचा उल्लेख आला आहे अशी दुर्मिळ वनस्पती म्हणून आणि रानमेवा म्हणूनही प्रसिद्ध असलेले निवडुंग हे फळ अत्यंत काटेरी असते असे असले तरी ते आरोग्यास उपकारकारक असल्याची चर्चा आहे.दरम्यान या निवडुंग वनस्पतीची चव चाखण्याचा योग काल आष्टी येथील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आला.आष्टी येथील विविध ग्रुप आपल्या आरोग्यासाठी म्हणून सकाळी विविध मार्गांवर धावत आणि चालत असतात.असाच सुप्रभात माॕर्निंग ग्रुपचे सदस्य आष्टीचे जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे आणि प्रहार दिव्यांग संघटनेचे नेते तथा पत्रकार अण्णासाहेब साबळे हे मॉर्निंग वाक करीत होते.मॉर्निंग वाॕक करीत असतानाच आष्टी येथून काही अंतरावर असलेल्या परिसरामध्ये निवडुंग नावाचा वनस्पतीचा रानमेवा त्यांच्या दृष्टीक्षेपास पडला.वाचनात आल्यानुसार त्यांनी तात्काळ त्या निवडुंग वनस्पती अत्यंत काटेरी झुडपातून त्यांनी काढली आणि त्या लालबुंद अशा फळाला चाखण्याचा योग त्यांना आला.हे निवडूंग वरून अत्यंत काटेरी असले तरी आतून मात्र अत्यंत मऊ गोड रसाळ असल्याचे दै.झुंजार नेता उपसंपादक,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे आणि राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे आष्टी तालुकाध्यक्ष,दै.लोकमंथन,दै.
प्रभास कैसरी चे बीड जिल्हा संपादक आण्णासाहेब साबळे यांनी सांगितले.या निवडुंग या रानमेव्याची शरीरासाठी अत्यंत उपयुक्त अशी चव आणि फायदा असल्याचे आयुर्वेदाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञांनी सांगितले.यासाठी संबंधित विभागाच्यावतीने या रानमेव्याचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे समाजधुरिणांचे म्हणणे आहे.