क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशबीडमहत्वाचेमहाराष्ट्रसंपादकीय

जिल्हापुरवठा व तहसिल कार्यालयातील राशन गैरव्यवहार प्रकरणात कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


जिल्हापुरवठा व तहसिल कार्यालयातील राशन गैरव्यवहार प्रकरणात कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
_____
बीड जिल्हा पुरवठा व तहसिल कार्यालय बीड विभागातील ५००० रेशनकार्ड गायब अनागोंदी कारभार व टीपीवर (ट्रान्सफाॅर्मर परमिट) बोगस सह्या घेऊन धान्य काळ्याबाजारात विकणे,पुरवठादार व रेशनदुकानदार यांच्याकडुन संगनमतानेच ग्राहकांची आर्थिक लुट प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२८ नोव्हेंबर २०२२ वार सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “थाळीनाद आंदोलन “करण्यात आले. आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्षबीडशेखयुनुसच-हाटकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती बीड तालुका सचिव मुश्ताक शेख , शेख मुबीन बीडकर,सय्यद आबेद बीडकर ,बलभीम उबाळे, जिल्हाध्यक्ष आप माजी सैनिक अशोक येडे,आप तालुकाध्यक्ष भिमराव कुटे सहभागी असुन निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी बीड संतोष राऊत यांना देण्यात आले.



जिल्हा पुरवठा विभागातुन ५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल संबधित आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
_____
बीड जिल्हा पुरवठा विभागातुन ५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर वामन कदम उपायुक्त (पुरवठा)औरंगाबाद यांच्या ५ वेळा लेखी आदेश देऊन सुद्धा गुन्हे दाखल न केल्याबद्दल जिल्हाधिकारी बीड तसेच जिल्हा पुरवठा आधिकारी बीड व तहसिलदार बीड यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.

टीपीवर(ट्रान्सफाॅर्मर परमिट)सह्या घेऊन अर्धा माल काळ्याबाजारात विक्री प्रकरणात गुन्हे दाखल करा
___
बीड जिल्ह्य़ातील गोरगरीबांच्या हक्काचे राशन आधिकारी,रेशनदुकानदार आणि कंत्राटदाराच्या संगनमतानेच चक्क टीपीवर (ट्रान्सफाॅर्मर परमिट) खोट्या सह्या करून परस्पर रेशनचा माल काळ्याबाजारात विकण्यात येत असुन संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

३) विधवा,परित्यक्ता तसेच दिव्यांग यांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा.

४) तहसिल कार्यालयात बोगस उत्पन्न प्रमाणपत्राचा डाटा एन्ट्री साठी वापर प्रकरणात कारवाई करण्यात यावी.
___
बीड तहसिल कार्यालयात बनावट उत्पन्न प्रमाणपत्र वितरीत करण्यात येऊन त्या आधारे रेशनसाठी डाटा एन्ट्री करण्यात येत असून संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.

५) दर महिन्याचे नियमित रेशन वाटप करण्यात यावे.
___
पुरवठा विभाग,रेशन दुकनदार व कंत्राटदार संगनमतानेच दर महिन्याचे रेशन नियमित वाटप करत नसुन ग्राहकांची आर्थिक लुट करून धान्या काळ्याबाजारात विकण्यात येत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली असून संबधित प्रकरणात जबाबदार पुरवठा व तहसिल कार्यालयातील आधिकारी व कर्मचाऱ्यांवर तसेच रेशन दुकनदार,कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button