मैत्रिणीसोबत मोबाईलवर ‘चॅटींग’ विद्यार्थिनीला दोन युवकांनी शाळेत घूसून केली मारहाण
भंडारा : मोबाईलवर, सोशल मीडियावर चॅटींग करताना काळजी घेतली पाहिजे. कारण आपण चॅटींग करताना समोरच्या व्यक्तीच्या समोर उभे नसतो. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आपण समजून घेवू शकत नाही.
तसेच समोरच्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय आहे याचा अंदाज आपल्याला बांधता येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चॅटींग करताना काळजीपूर्वक बोललं पाहिजे. किंवा निदान हातचं राखून बोललं पाहिजे. अन्यथा त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.
भंडारा जिल्ह्यात तसाच काहीसा प्रकार बघायला मिळाला आहे. अर्थात भंडाऱ्यात घडलेल्या घटनेचा निषेधच. त्या घटनेचं समर्थन करता येणार नाही. पण काही गोष्टी आपल्या हातात असतात, हे मात्र तितकंच खरं.
दुसरीकडे माफ करणारा व्यक्तीला महान मानलं जातं. त्यामुळे चूक करणाऱ्यांना माफ करायला हवं. पण भंडाऱ्यात भलतंच काहीतरी घडलं. मैत्रिणीसोबत मोबाईलवर ‘चॅटींग’ करणे एका बारावी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला चांगलेच महागात पडले.
भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील एका शाळेतील विद्यार्थिनीला दोन युवकांनी शाळेत जाऊन मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी साकोली पोलिसांनी पोस्को अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
इयत्ता बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने मैत्रिणीसोबत मोबाईलवरून ‘चॅटींग’ केली. ‘चॅटींग’मध्ये बदनामीकारक बोलल्याच्या कारणावरून मंगळवारी 23 ऑगस्ट रोजी शाळेत जाऊन आरोपी तरुणांनी विद्यार्थिनीला मारहाण केली.
दरम्यान, शिक्षकांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी दुर्गेश रणजीत कुसराम (वय 20, रा. पंचशील वॉर्ड साकोली), कुंदन ऊर्फ साजन रामेश्वर ढोके (वय 22, रा. जमनापूर) या दोघांना अटक केली आहे.