शिवसेनेचा बच्चू कडू यांना मोठा धक्का

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

अमरावती : राज्यात एकीकडे शिंदे गट विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे यांचा राजकीय सामना रंगला असतानाच, दुसरीकडे अमरावतीत शिवसेनेनं बच्चू कडू यांना मोठा धक्का दिला आहे.
दर्यापूर तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा तालुकाप्रमुख किरण होले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. किरण होले हे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष होते. मात्र, आता त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत हातात शिवबंधन बांधलं आहे.

प्राप्त माहितीनुसार, अमरावती शिवसेना जिल्हाप्रमुख खराटे यांच्या नेतृत्वात किरण होले यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषदचे अपक्ष असलेले सदस्य सुनील डिके यांनी सुद्धा हाती शिवबंधन बांधलं आहे.