Manoj Jarange Patilमराठा आरक्षण

आमदार प्रकाश सोळुंकेंच्या घरावर हल्ला करणाऱ्या 17 संशयित आरोपींना जामीन


बीड : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून माजलगावमध्ये जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या 17 संशयित आरोपींना माजलगावचे अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.



30 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांच्या घरावर दगडफेक करून, जाळपोळ करण्यात आली होती. त्याचबरोबर नगरपरिषद कार्यालय देखील पेटवून देण्यात आले होते. यामध्येच अटक करण्यात आलेल्या 17 संशयित आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेली जाळपोळ आणि दगडफेकीच्या संशयावरून 20 लोकांच्या विरोधात बीडच्या माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत अटक सत्र सुरु केले. ज्यात एकूण 17 संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. हे सर्व संशयित आरोपी एक महिन्यापासून जिल्हा कारागृहामध्ये होते. दरम्यान, अखेर या 17 संशयित आरोपींना माजलगावच्या सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

पोलीस प्रशासन लागलं कामाला…

माजलगाव व बीड शहरातील जाळपोळीच्या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील पाहायला मिळत आहे. या प्रकरणात लक्षवेधी झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिली. दरम्यान, याची तत्काळ दखल घेत बीड पोलीस प्रशासन कामाला लगले असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदार, अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवत, आंदोलनातील गुन्ह्यात जे आरोपी आहेत ते शोधून त्यांना अटक करा असे आदेश दिले आहेत. प्रत्येक गुन्ह्यांचा लवकरात लवकर निपटारा करा, अशा सूचना सुद्धा पोलिस अधीक्षक ठाकूर यांनी जिल्हाभरातील पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button