मुंबईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करा’; इम्तियाज जलील यांचं मोठं व्यक्तव्य

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई :औरंगाबादचे नाव “छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे “धाराशिव’ करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला शुक्रवारी केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, कित्येक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या या दोन जिल्हांच्या नामांतरावर अखेर केंद्राकडूूनही शिक्कामोर्तब करण्यात आले.
यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार देखील मानले आहेत. तर, दुसरीकडे एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी या मुद्द्यावरून राज्यसरकारवर ताशेरे ओढले आहेत.

अश्यातच, इम्तियाज जलील यांनी मुंबईचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे व्यक्तव्य केलं आहे. “मुंबईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर’ करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर नागपूरचं नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर करा, असंही जलील म्हणालेत.

मुंबई, पुणे नागपूर, कोल्हापूर या शहरांचं नाव बदल्याचीही मागणी त्यांनी केलीय. सध्या त्यांचं हे व्यक्तव्य सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत असून, आता यावर राजकीय नेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रवास ऐतिहासिक आणि रंजक आहे. साधारणपणे सन 1988 पासून ‘औरंगाबाद’ शहराचे नामकरण ‘संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबाद’ शहराचे नामकरण ‘धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. मुघल शासक औरंगजेबाच्या नावाला विरोध करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘संभाजीनगर’ ची घोषणा केली.

तेव्हापासून शिवसेना आणि संबंधित प्रकाशने, शिवसैनिक आणि काही संघटना औरंगाबादचा उल्लेख “संभाजीनगर’ असाच करायचे. पुढे 1995 मध्ये शिवसेना-भाजप युती नामांतराचा निर्णय घेतला होता. पण, त्यानंतरच्या सरकारने तो प्रस्ताव पुढे जाऊ दिला नाही.

पुढे नामांतराबाबत मागण्या, घोषणा झाल्या. पण, ठोस निर्णय झाला नव्हता. मात्र, नुकतंच या राज्य सरकारच्या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली असून, कित्येक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या या मुद्याचा अखेर निकाल लागला आहे.