ताज्या बातम्यादेश-विदेशधार्मिकमहत्वाचेमहाराष्ट्र

रयतेच्या भल्याकरिता जे जे करता येईल ते सर्व करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पुणे : रयतेने आम्हाला विश्वस्त म्हणून राज्यात काम करण्याची संधी दिली. त्यामुळे रयतेच्या भल्याकरिता जे जे करता येईल ते सर्व आम्ही करू. यासाठी लागणारी शक्ती आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज देतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.



सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनानिमित्त पुणे येथील शिवनेरी गडावर ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं हे ३५० वे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने युगप्रवर्तक होते. आपल्या सर्वांना आज स्वातंत्र्याची अनुभूती होत आहे आणि उत्तम जीवन जगता येत आहे, याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांनी स्वातंत्र्य, स्वराज्य आणि स्वधर्म काय असतो हे आपल्याला शिकवलं आहे.”

“ज्या काळात अनेक देशातील राजे आणि राजवाडे मुघलांचं मंडलिक बनून काम करायला तयार होते, त्या काळात आई जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा मुलमंत्र समाजात रोवला. अगदी सामान्य मावळ्यांना आणि अठरापगड जातीच्या लोकांना एकत्रित करुन मुघलांसारख्या बलाढ्य शत्रुचा नाश केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करणं शिकवलं. त्यामुळे आज ते आपलं दैवतच आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला आता ३५० वर्ष झाले आहे. तरीसुद्धा मला विश्वास आहे की, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तो पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार भारतभुमीवर होतच राहणार आणि आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेत राहू,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “आम्ही स्वराज्याची स्थापना केली हे जगाला दाखविण्याकरिता छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक होऊनही महाराजांनी कधीच आराम केला नाही. रयतेचे राज्य चालविण्याकरिता ते कायम कामच करत राहिले. यातूनच आम्हाला प्रेरणा मिळते. रयतेने आम्हाला विश्वस्त म्हणून राज्यात काम करण्याची संधी दिली. त्यामुळे रयतेच्या भल्याकरिता जे जे करता येईल ते सर्व आम्ही करू. यासाठी लागणारी शक्ती आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज देतील. म्हणूनच चंद्र सूर्य असेपर्यंत युगप्रवर्तक शिवरायांचा जयजयकार होत राहील,” असेही ते म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button