पोलिसाला बेदम मारहाण करत दिली जिवे मारण्याची धमकी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे:  हायवा डंपर अडवला म्हणून दोघांनी भर रस्त्यात पोलीस अंमलदाराला बेदम मारहाण केली. शिवीगाळ करत पोलिसाचा खून करण्याची धमकी दिली सायंकाळी सात वाजता क्रोमा टी जंक्शन, हिंजवडी फेज दोन येथे घडला.

अमित साखरे, प्रथमेश हांडे (दोघे रा. हिंजवडी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासह हायवा डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सोमनाथ दिवटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस अंमलदार दिवटे हे हिंजवडी फेज दोन येथे कर्तव्यावर असताना आलेल्या हायवा डंपरला त्यांनीच अडवले. त्या कारणावरून डंपरचा मालक अमित आणि त्याचा मित्र प्रथमेश यांनी दिवटे यांना लाथाबुक्क्याने जमिनीवर पाडून बेदम मारहाण केली. अमित याने शिवीगाळ करत, आमची गाडी अडवतो का, तुझा मर्डर करतो. मी हिंजवडीचा भाई अमित साखरे आहे. काढ रे हत्यार याचा मर्डर करून टाकू, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.