सोबत जगले अन् सोबतच सोडलं जग..

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

पतीच्या निधनाची बातमी समजताच पत्नीला मोठा धक्का बसला. पतीच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासातच पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. नवसारी शहरात
पतीच्या निधनाची बातमी समजताच पत्नीला मोठा धक्का बसला. पतीच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासातच पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

घटना नवसारीमधल्या खेरगाम इथल्या तोरवनवेरा गावात घडली आहे. इथं एका अपघातात अरुण गावित या 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. हे वृत्त समजताच मृत अरुणची पत्नी भावना बेशुद्ध पडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं; पण त्यांचा मृत्यू झाला.

भावना यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, असं डॉक्टरांनी सांगितलं. पतीचा मृत्यू झाल्याचा धक्का बसल्याने अवघ्या अर्ध्या तासात पत्नीचाही मृत्यू झाला. या जोडप्याला दोन मुलं आहेत.

दोन्ही मुलं पालकांच्या अचानक झालेल्या निधनाने अनाथ झाली आहेत. मृत भावना गावित खेरगामच्या माजी सरपंच होत्या. पतीच्या मृत्यूची बातमी कळताच पत्नीचेही निधन झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अरुण गावित यांचा गुरुवारी रात्री गावातच दुचाकी घसरल्याने अपघाती मृत्यू झाला.

अरुण गावित यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या पत्नी भावना गावित बेशुद्ध झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं; पण त्यांना बसलेला धक्का इतका तीव्र होता, की त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचं निधन झालं. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर गावावर शोककळा पसरली आहे.