थरारक! मोक्कातील आरोपीस पकडताना झटापट; फौजदाराला लागल्या दोन गोळ्या

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

हिंगोली  मोक्कातील आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या फौजदारावर झटापटीत दोन गोळ्या झाडल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घडली  मात्र नेमक्या आरोपीनेच गोळ्या झाडल्या की नाही? हे अद्यापही पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले नाहे.

आरोपीचे नाव बबलू हत्यारसिंग टाक (वय २८ वर्षे, रा. इंदिरानगर कळमनुरी) हा आरोपी मोक्काचा आहे. तो कळमनुरी येथे त्याच्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी त्याला अटक करण्यासाठी फौजफाटयासह गेले होते. अटक करताना झटापटीमध्ये २ ते ३ गोळ्या माजिद यांना लागल्या. या गोळ्या फौजदार माजिद खान यांच्या डाव्या व उजव्या छातीवर लागल्या. मात्र त्या आरोपीने झाडल्या की पोलिसांच्या पिस्टलमधून निघालेल्या आहेत? हे स्पष्ट झाले नाही.

कळमनुरी येथे फौजदार माजिद यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोनी वैजनाथ मुंडे यांनी पाहणी केली. या प्रकारामुळे कळमनुरीत एकच खळबळ उडली आहे. घटनास्थळी तसेच रुग्णालय परिसरात बघ्यांचीही गर्दी जमली होती.