क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंगळवेढ्यात एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृण हत्या


मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे तीन महिलांची (मंगळवार) दुपारच्या दरम्यान निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घरातील तीन महिलांच्या खून सत्रामुळे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडेसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या नंदेश्वरात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने दिपाली बाळू माळी (वय-25), संगीता महादेव माळी (वय-50), पाराबाई बाबाजी माळी (वय-45) या तीन महिलांचा घरासमोरच हत्याराच्या सहायाने खून केला.

या घटनेनंतर या तिन्ही जखमी महिल घरासमोरच अत्यावस्थ अवस्‍थेत पडल्‍या होत्‍या. या घटनेने नंदेश्वरात खळबळ उडाली असून, पोलीस निरीक्षक रणजीत माने घटनास्थळी दाखल झाले. हत्येच्या कारणामागील शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला असून, एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या तीन महिलांच्या खुनामुळे नंदेश्वर गावावर शोककळा पसरली असून, अचानक झालेल्या या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

त्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत एका संशयितास ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तपासाअंती या खुनाचे कारण स्पष्ट होणार आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button