ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

मुंबईतील कमला नगर झोपडपट्टीत भीषण आग; २५ पेक्षा जास्‍त घरं जळून खाक


मुंबईतील कमला नगर येथील झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्‍या आहेत. अग्‍निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत.या भीषण आगीत २५ घरं जळून खाक झाली आहेत. दरम्‍यान प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाल्‍याचे वृत्‍त नाही.

आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कमला नगर झोपडपट्टीमध्ये मोठी आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्‍याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा परिसर दाटीवाटीचा असल्‍याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत आहेत. तीन तासानंतरही अद्‍याप आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्‍निशमन दलाचे प्रयत्‍न सुरू आहेत. अग्‍निशमनच्या २५ गाड्या घटनास्‍थळी दाखल झाल्‍या आहेत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button