पुणे महिलेचे अंघोळ करताना मोबाईलमध्ये चित्रीकरण

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे : (आशोक कुंभार ) बाथरूममध्ये अंघोळ करणार्‍या महिलेचे एकाने मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले.

तसेच ते पतीच्या मोबाईलवर पाठवून नातेवाईकांना व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार पुण्यातील वाडेबोल्हाई येथे घडला आहे. याप्रकरणी एकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 35 वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.18) फिर्याद दिली आहे. त्यानुसार संभाजी सर्जेराव पवार मुळ रा. बोरखेडी, ता. शेणगांव जि. हिंगोली याच्याविरुद्ध आयपीसी 354 (क) 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.16) सकाळी अकराच्या सुमारास घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची पूर्वी भांडण झाले होते.
या भांडणाचा राग मनात धरुन आरोपीने फिर्यादी बाथरुममध्ये अंघोळ करीत असताना चोरुन अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले.
फोटो आणि व्हिडिओ फिर्यादी यांच्या पतीच्या मोबाईलवर पाठवले.
तसेच फिर्यादी यांच्या नातेवाईकांच्या मोबाईल नंबरची यादी पतीला पाठवून व्हिडिओ आणि फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली.
त्यानंतर आरोपीने पतीला पाठवलेले सर्व मेसेज डिलीट केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.