असहायपणे भटकत असताना तिला रिक्षा चालकाने पाहिले अन..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


उत्तर प्रदेश : पुणे शहरातील एक महिला उत्तर प्रदेशात पोहचली. फरेंडा येथे असहायपणे भटकत असताना तिला रिक्षा चालकाने पाहिले. तिची चौकशी केली. त्यानंतर तिला धीर देत फरेंडा पोलीस ठाण्यात नेले.

महिलेने पोलिसांसमोर आपबिती सांगितली. पोलिसांनी तिला मदतीचे आश्वासन दिले. परंतु खरी परिस्थिती चौकशीनंतरच समजणार आहे. पतीच्या हत्येनंतर (Crime)पोलिसांचा त्रास सुरु झाला आणि मुलेही सोडून गेल्याचा दावा त्या महिलेने केला आहे. महिलेची मुले आहेत का? मग मुले आईला का सोडून गेली आहेत? या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहे.

पुणे शहरातील नऱ्हे परिसरात अशोक आर्य पत्नी रुचासह राहत होते. रुचा हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचे पती अशोक आर्य एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. परंतु त्यांची हत्या झाली. पतीच्या हत्येनंतर मुले सोडून हैदराबादला गेले.

नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्थानिक पोलिसांचा त्रास सुरु झाला. त्यामुळे तिला आपले उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले. मग तिने पुणे सोडले आणि भटकंती करु लागली. भटकता भटकता ती फरेंडा या शहरात पोहचली. रिक्षा चालकाने तिला पोलीस ठाण्यात आणले.