Video:एका सुसाट गाडीने अनेकांना चिरडलं

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


हरिद्वार : बहादराबादमध्ये वरातीत बेधुंद नाचणाऱ्या एका सुसाट वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत. बहादराबाद धानोरी रोडवर असलेल्या सरदार फार्म हाऊस इथे रात्री उशिरा बेलडा गावात ही वरात सुरू होती.

यावेळी लग्नात आलेले सर्व वऱ्हाडी मंडळी नाचण्यात मग्न होते. त्याचवेळी रस्त्यावरून बहादराबादहून धानोरीच्या दिशेने एक स्कॉर्पिओ सुसाट येताना दिसली. ही स्कॉर्पिओ सुसाट वेगाने वरातीत नाचणाऱ्यांच्या अंगावरून गेली. या घटनेत सागर रहिवासी रायसी पोलीस स्टेशन लक्सर नावाच्या बँड लीडरचा मृत्यू झाला. या अपघातात एकूण ३१ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने स्कॉर्पिओ चालकाला मारहाण करून त्याच्या वाहनाचे नुकसान केले.

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी घटनास्थळी जमाव हटवून वाहतूक सुरळीत केली. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली अन्यथा हा वाद आणखी चिघळला असता.