
पुणेः १३ वर्षीय तरुणीची वडिलांनी हत्या केल्यानंतर स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . काल रात्री पुणे शहरातील स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला.
याप्रकरणात खून झालेल्या मुलीच्या आईने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मुलीची हत्या करून तिच्या वडिलांनी तिचा मृतदेह कॅनॉल मध्ये फेकून दिला. त्यानंतर स्वतः वडिलांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. वडिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मागील २ तासांपासून पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान मृतदेहाचा शोध घेत आहेत.