Video : आधी खाल्ला मार, नंतर घेतला खतरनाक बदला

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. काही लोकांना मुक्या प्राण्यांना त्रास देण्यात खूप मजा वाटते.

कधी शेपटी खेच, कधी कान खेच, त्यांना दोरी किंवा पट्ट्याने बांधून ठेवणं, विनाकारण मारणं असे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे.

ज्यात एक तरुण एका गाढवाला विनाकारण बेदम मारहाण करताना दिसून येत आहे. सुरूवातीला हे गाढवं निर्मुटपणे या तरुणाचा मार सहन करतं. मात्र, सहनशीलतेचा अंत झाल्यानंतर गाढवानेही छळ करणाऱ्या या तरुणाला चांगलीच अद्दल घडवली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (viral Video) झाला आहे.

 

गाढव म्हणजे मूर्ख प्राणी असेच अनेक जण म्हणतात. तो शांत आणि कमजोर म्हणून काहीच करू शकत नाही, असंच अनेकांना वाटलं. या तरुणाचाही तसाच समज झाला. म्हणून गाढवासारख्या मुक्या जीवाशी पंगा घेण्याची हिंमत त्याने केली.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक गाढव आणि एक तरुण दिसतो आहे. गाढव शांत उभं आहे. तरुण त्याला मारहाण करतो आहे. त्याच्या तोंडावर सटासट हाताने मारत आहे. अगदी कपडे धुवावेत तसं तो गाढवाला धुताना दिसतो. गाढव बिच्चारं शांत, निमूटपणे मार सहन करत असतो त्याची दया येते. व्हिडीओ पाहून आपलाही संताप होतो.

दरम्यान, गाढवाचा संयम सुटून त्यानेही आपलं रौद्र रूप दाखवलं. गाढवाने ऑन द स्पॉट या तरुणाला भयानक शिक्षा दिली. जेव्हा तरुण हा गाढवाच्या पाठीवर बसायला जातो. तेव्हा गाढव त्याचा पाय चावून टाकतं. त्यामुळे हा तरुण खाली पडतो. खाली पडल्यावरही गाढव या तरुणाचा पाय काही सोडत नाही. गाढवाने पाय चावल्यानंतर या तरुणाला खूप वेदना होतात आणि तो जोरजोरात ओरडायला लागतो.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ @Wasim R Khan नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘गधे ने गधे से लिया बदला’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. सुरुवातीला व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी जितका संताप व्यक्त केला तितकाच आनंद त्यांना व्हिडीओचा शेवट पाहून झाला आहे. कारण छळ करणाऱ्या या हैवानाला गाढवाने चांगलीच अद्दल घडवली आहे.