शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जाचं टेन्शन दूर होणार..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली आहे.

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी १ हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे या योजनेचे नाव आहे. राज्य सरकारच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी खुशखबर आहे. शिंदे सरकारने (Maharashtra Government) शेतकऱ्यांसाठी १ हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अवघ्या पाच महिन्यात ४ हजार ७०० कोटी रुपयांचे वाटप होणार आहे. शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.

शिंदे सरकारने 29 जुलै रोजी शेतकरी (Farmer) कर्जमुक्ती योजनेचा निर्णय घेतला होता. 29 ऑगस्ट रोजी कर्जमुक्ती योजनेसाठी 4 हजार 700 कोटी रुपयांची घोषणा केली होती. 16 सप्टेंबर रोजी 2 हजार 350 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला. (Maharashtra Latest News)

18 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या हप्त्यापोटी 650 कोटी मंजूर करण्यात आला. तर 17 जानेवारीला तिसऱ्या हप्त्यापोटी 700 कोटी मंजूर करण्यात आले. त्यानंतर आज मंगळवारी शिंदे सरकारकडून शिल्लक एक हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शिंदे सरकारच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.