ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रसंपादकीय

टाटांनी पत्नीचे दागिने विकले आणि उभारलं कॅन्सर हॉस्पिटल…


अशी आहे यामागची गोष्ट?जमशेदजी टाटा यांच्या मोठ्या सून मेहेरबाई टाटा होत्या. त्यांना त्यांच्या लग्नात पती दोराबाजीने २४५ कॅरेटचा ज्युबली डायमंड भेट दिला, याचे वजन कोहिनूरच्या दुप्पट असल्याचे सांगितले जाते. कर्करोगाने त्यांच्या अकाली मृत्यूनंतर दोराबजी टाटा यांनी हा हिरा विकून टाटा मेमोरियल रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली. प्रेमाचे हे स्मारक म्हणजे मानवतेला दिलेली देणगी!

 

प्रेमाच एक खूप मोठं प्रतीक ताजमहालाला मानलं जातं. पण याहूनही एक मोठं प्रेमाच प्रतीक आपल्या महाराष्ट्रात आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

टाटा मेमोरियल हॉस्पिटलबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, हे एक चॅरिटी हॉस्पिटल आहे जे ६०-७० % रुग्णांना मोफत सेवा देतं.

टाटा हॉस्पिटल हे कॅन्सरसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे, सर्वसामान्य लोकांसाठी हे हॉस्पिटल एका दूताहून कमी नाही. टाटा हॉस्पिटल हे मुंबईमध्ये ६० एकरमध्ये पसरलेल्या, एसीटीआरईसीमध्ये क्लिनिकल रिसर्च सेंटर आणि कॅन्सर रिसर्च सेंटर आहे.

टाटा हॉस्पिटल हे दोराबाजी टाटा यांनी त्यांच्या पत्नी मेहेरबाई टाटा यांच्या निधनानंतर १९३२ यांनी सुरू केलं. मेहेरबाईंना ब्लड कॅन्सर होता अन् तेव्हा कॅन्सरसाठी भारतात कोणत्याही सोयी उपलब्ध नव्हत्या त्यामुळे त्यांच्या निधनानंतर दोराबजी टाटा यांना त्यांच्या पत्नीवर उपचार करण्यात आलेल्या रुग्णालयासारखीच सुविधा भारतात आणायची होती.
दोराबजीच्या मृत्यूनंतर त्याचा उत्तराधिकारी नोरोजी सकलातवाला यांनी त्यासाठी पुढे प्रयत्न केले. अखेर जेआरडी टाटांच्या पाठिंब्यामुळे २८ फेब्रुवारी १९४१ रोजी मुंबईतील परळमध्ये असलेल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सात मजली इमारतीचे स्वप्न साकार झाले. १९५७ मध्ये, भारताच्या आरोग्य मंत्रालयाने टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे तात्पुरते नियंत्रण घेतले. १९६२ मध्ये रुग्णालयाचे प्रशासकीय नियंत्रण भारताच्या अणुऊर्जा विभागाने ताब्यात घेतले. चार वर्षांनंतर, कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट आणि टीएमसी यांचे विलीनीकरण झाले.

१५,००० चौरस मीटर परिसरात पसरलेल्या ८० बेड्सच्या रुग्णालयापासून सुरुवात करून, TMC आता जवळपास ७०,००० चौरस मीटरमध्ये ६०० बेड्समध्ये पसरले आहे. १९४१ मध्ये वार्षिक बजेट रु. ५ लाख, ते आता रु. ते १२० कोटींच्या जवळपास पोहोचले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button