अल्पवयीन प्रेमीयुगुल बाईकसह विहिरीत कोसळले अन पाण्यात बुडून मृत्यू

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

सांगली : तासगाव तालुक्यातील अल्पवयीन प्रेमीयुगुल मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीसह विहिरीत पडल्याची घटना घडलीय. घटनेत युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर युवक बचावला. याबाबत तासगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

हे अल्पवयीन प्रेमीयुगुल गावाशेजारी असणाऱ्या एका ठिकाणी गेले होते. काही वेळानंतर त्या युवतीला घरी सोडण्यासाठी ते दुचाकीवरून घरी परतत असताना वाटेत अंधार असल्याने युवकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. रस्त्याशेजारी असणाऱ्या विहिरीत ते दोघेजण दुचाकीसह कोसळले. युवकाला पोहता येत असल्याने तो बचावला.

रात्री तो विहिरीबाहेर आला, पण युवतीला पोहता येत तसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर युवतीच्या पालकांनी तासगाव पोलिसात संबंधित युवकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेबाबत तासगाव पोलिसांनी माहिती दिल्यानंतर भारती विद्यापीठ रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. भारती विद्यापीठ रेस्क्यू टीमचे गजानन नरळे आणि सांगलीची HERF रेस्क्यू टीम आणि महेश कुमारमठ यांनी मृतदेह आणि मोटरसायकल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिली.