बीड कार-ऑटोचा अपघात; १ ठार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


कार आणि ऑटोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 1 जण जागीच ठार झाला आहे. हा अपघात बीडच्या केज-मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावरील सारूळ शिवारात झाला आहे.

बीड : कार आणि ऑटोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 1 जण जागीच ठार झाला आहे. हा अपघात बीडच्या केज-मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावरील सारूळ शिवारात झाला आहे. तर कार धडकेनंतर ऑटो खड्डयात उलटली. त्यामुळं ऑटो चालक महेश पुरी वय 23, रा. सारूळ ता. केज याचा जागीच मृत्यू झाला आहे.

महेश पुरी हे ऑटो घेऊन नांदूर फाट्याकडे जात असताना सारूळ शिवारात समोरून येणाऱ्या कारने भरधाव वेगात ऑटोला जोराची धडक दिली. झालेल्या भीषण अपघातात ऑटो हा रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खड्ड्यात जाऊन उलटला

ऑटो चालक महेश पुरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गतवर्षी मयत चालकांच्या वडिलांचा याच ठिकाणी अपघात होऊन मृत्यू झाला होता. दरम्यान केज पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.