सख्ख्या बहिणींनी सख्ख्या भावांशीच केलं होतं लग्न, ८ वर्षांनंतर सोबतच या दोन्ही भावांचा झाला अपघातात मृत्यू

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


खेळ कुणाला दैवाचा कळला! २ सख्ख्या बहिणींनी सख्ख्या भावांशीच केलं होतं लग्न, ८ वर्षांनंतर सोबतच या दोन्ही भावांचा झाला अपघातात मृत्यू; वाचा कुठं घडलीये ही दुर्देवी घटना
राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील सरदारशहर भागात तीन दिवसांपूर्वी एक हृदयद्रावक अपघात समोर आला आहे. आठ वर्षांपूर्वी येथे दोन सख्ख्या बहिणींचे लग्न झाले.

दोघींचे पतीही एकमेकांचे सख्खे भाऊ होते. त्यांच्या दोन्ही पतींचा शुक्रवारी रस्ता अपघातात मृत्यू झाला. या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबीयच नव्हे तर संपूर्ण गावही हादरून गेले.

चुरू : राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील (Rajasthan Churu District) सरदारशहर भागात (Sardarshahr Area) तीन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण रस्ता अपघातात (Road Accident) एकत्र मृत्यूमुखी (Death) पडलेल्या तीन तरुणांमध्ये दोन सख्ख्या भावांचा (Two Brothers) समावेश होता. दोन्ही भावांचे एकाच दिवशी एकाच घरात लग्न झाले होते. पुढे नियतीच्या क्रूर खेळात दोघांचाही एकाच दिवशी मृत्यू झाला (Death On Same Day). या अपघातात ठार झालेल्या चार तरुणांचे तीन नातेवाईक होते. चौथा त्याचा चुलत भाऊ होता. हे तिघेही आपल्या मेहुण्याच्या लग्नासाठी आले होते. लग्नानंतरचे विधी करण्यासाठी हे तिघेही मेव्हण्याला त्याच्या सासरी घेऊन निघाले होते. या दरम्यान वाटेत त्यांचा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात प्राण गमावलेल्या चार तरुणांपैकी रुघाराम आणि सीताराम हे दोघे सख्खे भाऊ होते. ते चुरू जिल्ह्यातील बांधनाऊ येथील रहिवासी होते. त्यांच्यासोबत त्यांचा मोठा साडू ताराचंद हाही अपघाताचा बळी ठरला. तिघेही सख्खे साडू होते. त्यापैकी सीताराम आणि रुघाराम यांचा आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. सीताराम यांचा विवाह राणासर बिकन येथील रहिवासी मंजू देवी यांच्याशी झाला होता तर रुघाराम यांचा विवाह राजुदेवीशी झाला होता. मंजुदेवी आणि राजुदेवी यांची मोठी बहिण मैनादेवीचा विवाह १२ वर्षांपूर्वी ताराचंदशी झाला होता. ताराचंद हेही आदमलसर येथील रहिवासी होते.