क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेसंपादकीय

सर्वात मोठी बातमी! आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा


स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू यांना गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला आहे. आसाराम बापू हा 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला आहे.

आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गांधीनगर कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. काय आहे आसाराम बापू प्रकरण ? आसाराम बापूवर उत्तर प्रदेशच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे आसारामच्या आश्रमात शिकत होती.

या मुलीच्या आरोपानुसार, आसारामने तिला जोधपूरजवळच्या आश्रमात बोलावलं होतं. आणि ऑगस्ट 15, 2013ला तिच्या बलात्कार करण्यात आला. आसाराम बापू यांच्या खटल्याचा घटनाक्रम – 20 ऑगस्ट 2013ला आसारामानी 15 ऑगस्ट रोजी एका मुलीचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिल्लीत दाखल करण्यात आली नंतर हा खटला जोधपूर कोर्टाकडे सोपण्यात आला. – 23 ऑगस्ट 2013ला आसारामाविरोधात गुन्हा दाखल झाला.

पण यावर भडकलेल्या आसाराम समर्थकांची कमला मार्केट पोलीस स्टेशनमधे तोडफोड केली. – 28 ऑगस्ट 2013ला पीडित मुलीच्या वडिलांनी आसारामला फाशी देण्याची मागणी केली. तर दुसरीकडे मुलगी मनोरूग्ण असल्याचा दावा आसारामने केला. – 29 ऑगस्ट 2013ला काँग्रेस नेते मुद्दाम त्यांना लक्ष्य करून असले आरोप करत आहेत असा अप्रत्यक्ष आरोप आसारामने केला.

– 31 ऑगस्ट 2013ला आसारामला जोधपूर पोलिसांनी अटक केली, आसारामची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. पण या दरम्यान समर्थकांनी कोर्टाबाहेर गोंधळ घातला होता. – नोव्हेंबर 2013ला जोधपूर पोलिसांनी आसाराम विरोधात आरोपपत्र दाखल केलं. आसाराम आणि चार लोकांवर बलात्काराचे आरोप करण्यात आले.



– फेब्रुवारी 2014ला आसारामविरोधात कोर्टात सुनावणीला सुरूवात झाली. – ज्येष्ठ कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनी आसाराम बापू यांचं वकीलपत्र घेतलं होतं. – आसाराम बापूंना वेगळाच आजार आहे ज्यामुळे ते महिला त्याच्याकडे आकर्षित होतात असा अजब युक्तिवाद कोर्टात करण्यात आला. – फेब्रुवारी 2015ला आसाराम बापू केसमधील एक साक्षीदार राहूल सचान जेव्हा आपलं स्टेटमेंट द्यायला कोर्टात चालला होता तेव्हा त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

– 8 जुलै 2015ला दुसऱ्या एक साक्षीदार सुधा पाठक साक्षी देण्यावरून मागे फिरल्या आणि त्यांनी कोर्टात सांगितलं की आम्हाला आसाराम बापूबद्दल काहीच माहिती नाही. – 12 जुलै 2015रोजी क्रिपालसिंग या साक्षीदारची हत्या शहाजहानपूरमध्ये करण्यात आली. – 7 एप्रिल 2018रोजी जोधपूर कोर्टात दोन्ही पक्षांचे युक्तीवाद संपले. आणि आज 25 एप्रिल रोजी त्याच्या शिक्षेवर कोर्टात सुनावणी झाली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button