महिलेचा गोंधळ,कपडे काढले, एअर होस्टेसला मारहाण
एका ४५ वर्षीय महिलेने क्रू मेंबरला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अबुधाबीहून मुंबईला येणाऱ्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात घडली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका इटालियन महिलेला अटक केली. नंतर संबंधित महिलेला २५ हजारांच्या दंडात्मक रकेमेवर जामिन देण्यात आला आहे.
एअर विस्तारा फ्लाइट यूके २५६ सोमवारी दोन वाजून तीन मिनिटांनी अबूधाबी विमानतळावरुन विमानानं मुंबईसाठी उड्डाण घेतलं होतं. पाओला पेरुसिओ ही ४५ वर्षीय महिला अबुधाबीहून मुंबईकडे येणाऱ्या विस्तारा एअरलाईन्स विमानाने प्रवास करत होती.
पाओलाकडे इकॉनॉमी क्लासचे तिकीट होते. तरीही तिने बिझनेस क्लासमध्ये बसण्याचा आग्रह धरला. याला विरोध केल्यानंतर संबंधित महिलेने क्रू मेंबरच्या तोंडावर बुक्का मारला. एवढ्यावरच न थांबता या महिलेने हद्द पार करत अंगावारील काही कपडे काढले.
संबंधित महिला हे कृत्य करत असताना दारूच्या नशेत होती असे सहार पोलिसांनी सांगितले. घटनेवेळी इतर उपस्थित क्रू मेंबर्सने संबंधित महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने क्रू मेंबरवर थुंकले तसेच अंगावरील कपडे काढत अर्धनग्न अवस्थेत विमानात फिरू लागली.
विमान मुंबई विमानतळावर लँड झाल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर या महिलेला अटक करण्यात आली.
पेरुसिओच्या वैद्यकीय तपासणीच्या प्राथमिक अहवालात ही महिला प्रवासादरम्यान दारूच्या नशेत होती असे दिसून आले आहे, या प्रकरणी संबंधित महिलेला न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठोठावत जामीन मंजूर केला आहे.