ताज्या बातम्या

किरण पाटील यांना विजयी करा – डॉ. भारतभूषण क्षीरसागर


किरण पाटील यांना विजयी करा – डॉ. भारतभूषण क्षीरसागरनिवडणूक प्रभारी राणाजगजित सिंह पाटलांच्या उपस्थीतीत बैठक

बीड : मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकित जाणकराचे लक्ष ज्याच्या भुमीकेकड़े लागले होते त्या माजी मंत्री जयदत्त क्षिरसागरानी आपला पाठीबा भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार प्रा.किरण पाटील यांना अधिकृत दिल्याचे जाहिर केला आहे. दरम्यान भाजपा निवडणुक प्रभारी राणा जगजितसिंह पाटील यांनी बीड मध्ये येवून क्षिरसागरांच्या उपस्थितीत संस्था चालकांची बैठक घेतली. या वेळी माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर हे उपस्थीत होते.
या निवडणुकित क्षिरसागरानी आजपर्यंत आपला पाठीबा कोणालाही जाहिर केलेला नव्हता. अनेक वर्षापासून विक्रम काळेना त्यांची मदत होत असे. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शाळा, कॉलेज आणि समर्थक संस्थाचालक असून जिल्ह्यात त्यांची चांगली ताकद आहे. या निवडणुकीत शेवटपर्यंत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती मात्र काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दूरध्वनी संवाद झाल्यानंतर निवडणूक प्रभारी राणा जगजितसिंह पाटील हे तातडीने बीडला आले. क्षीरसागर यांच्या आदेशानुसार त्यांनी बीड मध्ये संस्था चालकांची बैठक घेतली या बैठकीला माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, प्राचार्य दीपाताई क्षीरसागर विलास बडगे, जगदीश काळे, आदित्य सारडा, श्री जोगदंड, दिलीप ख्रिस्ती, मुस्ताक अन्सारी, दिनकर कदम, अशोक जाधव यांच्यासह अनेकांची या बैठकीला उपस्थिती होती. बैठकीत शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणूक लढवणारे किरण पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय जाहिर करण्यात आला. दरम्यान या निर्णयामुळे विक्रम काळे यांना फार मोठा फटका बसणार असून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किरण पाटलांच्या विजयावर नक्कीच शिक्कामोर्तब होईल हे मात्र नक्की.
क्षीरसागर यांच्या भूमिकेमुळे किरण पाटील यांना बीड जिल्ह्यात मोठी ताकद मिळाली असून याचा मोठा फायदा त्यांना होणार असे चित्र स्पष्ट दिसत आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button