ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

Video :मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान अपघात, क्रेन उलटल्याने चौघांचा मृत्यू


तामिळनाडूच्या अरक्कोनम शहरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. रानीकोट जिल्ह्यातील अरक्कोनम येथील नेमिलीच्या मंडिअम्मन मंदिरात उत्सवादरम्यान क्रेन उलटून चार जणांचा मृत्यू झाला.
अपघातात 9 जण जखमी झाले असून सर्व

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रानीकोट जिल्ह्यातील अरक्कोनम भागात असलेल्या नेमिलीच्या मंडिअम्मन मंदिरात परिसरातील अनेक गावातील लोक जमले होते. मायलेरू नावाच्या सणाबद्दल खूप उत्साह होता आणि मंडिअम्मन मंदिरात लोकांची मोठी गर्दी झाली होती.

प्रथेनुसार लोक क्रेनला लटकून पुष्पहार घालण्याचा प्रयत्न करत होते. त्यानुसार मुथू कुमार, बूपलन आणि जोठी बाबू हे देखील क्रेनला लटकून पुष्पहार घालण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, अचानक तिघेही ज्या क्रेनला पुष्पहार घालण्यासाठी लटकले होते, ती क्रेन असंतुलित झाली.

घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत हा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. क्रेन उलटताच घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. अनेक जण पळून जाण्यात यशस्वी झाले तर 9 जण या अपघातात जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले. या अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button