आईने मुलीला घरी सोडायला सांगितले अन् घात झाला, नातेवाईकाने ..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सोळा वर्षीय शालेय विध्यार्थिनीवर तिच्या नातेवाईकानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन त्याने हे कृत्य केले.

पीडित मुलीच्या आईने आपल्या एका जवळच्या नातेवाईकाला शाळा सुटल्यावर मुलीला मोटारसायकल वरुन घरी सोडण्यास सांगितले. संबधित नातेवाईक 16 वर्षीय विध्यार्थिनीला शाळा सुटल्यावर घरी घेऊन गेला. घरात कुणी नसल्याचा फायदा घेऊन त्याने विध्यार्थिनीवर बलात्कार केला.

पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. आईला हा प्रकार समजल्याव तिने म्हापसा पोलिसात (Mapusa Police) तक्रार केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास म्हापसा पोलिस करीत आहेत.