ज्वेलर्सच्या दुकानांत चाेरी, पंचवीस तोळे सोन्यासह चांदीवर डल्ला

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


डोंबिवली पश्चिमेकडील नवापाडा परिसरात दोन ज्वेलर्स दुकानांवर काल रात्री चोरट्याने डल्ला मारला. या घटनेची नाेंद विसरु नगर पाेलिस ठाण्यात झालेली आहे.
पाेलिस (police) घटनेचा सखाेल तपास करीत आहेत.

नवापाडा परिसरात आज सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या दोन ज्वेलर्सला दुकानांत चाेरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी एका दुकानाचे शटर उचकटून दुकानातील ११ किलो चांदी व पंचवीस तोळा सोनं (gold) लंपास केले आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
दुसऱ्या दुकानामधून चाेरट्यांनी एक किलो चांदी चोरी केली. इतकंच नव्हे तर या चोरट्याने दुकानातील सीसीटीव्हीचे डीव्हीआर देखील फोडले. हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला आहे. या घटनेची नाेंद (dombivli) विसरू नगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.